|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » अंधेरीतील दुर्घटनेसाठी रेल्वेच जबाबदार : महापौर

अंधेरीतील दुर्घटनेसाठी रेल्वेच जबाबदार : महापौर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया गोखले पुलाच्या दुरावस्थेवरुन रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिकेत जुंपण्याची चिन्हे आहेत. गोखले पुलाच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची असून या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनच जबाबदार आहेत, असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला.

मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर पडला. यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली. या दुर्घटनेमुळे गोखले पुलाच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा पूल मुंबई महापालिकेने बांधला असून त्यांनीच देखभाल- दुरुस्ती करणे अपेक्षित होते, असे भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.