|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » उद्योग » शेअर बाजाराने अंतिम क्षणी तेजी गमावली

शेअर बाजाराने अंतिम क्षणी तेजी गमावली 

वृत्तसंस्था /मुंबई :

गुरुवारी शेअर बाजाराने शेवटच्या क्षणी दिवसभरातील तेजी गमावली. सेन्सेक्स आणि निफ्टीत  0.2 टक्क्यांनी घसरण होत तो बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टी 10,786 वर तर सेन्सेक्स 35.748.26 पर्यंत पोहोचला होता. बाजार शेवटच्या क्षणी 10,750 च्या जवळ जात बंद झाला. सेन्सेक्स 35,600 पर्यंत घसरण होत बाजार  बंद झाला. निफ्टीने 35 अंकापेक्षा जादा वाढ गमावली तर सेन्सेक्सनी 150 अंकाने वाढ गमावली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. बीएसईच्या मिडकॅप निर्देशांकात 0.7 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.7 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप 0.4 टक्क्यांनी कमोजोर होत बंद झाला.

बीएसईच्या 30 मुख्य समभागांच्या निर्देशांकाचा सेन्सेक्स 71 अंकाच्या म्हणजेच 0.2 टक्क्यांच्या घसरणीसह 35,574.5 वर बंद झाला. तर एनएसईच्या मुख्य 50 समभागातील शेअर्सचे निर्देशांकात 20 अंकानी म्हणजे 0.2 टक्क्यांची घसरणीसह 10,750 वर बंद झाला.

धातू निर्मीती, औषध निर्माण कंपन्या, पीएसयु, रियल्टी, आयटी, डय़ुरेबल कॅपिटल गुड्स, ऑईल आणि गॅस आणि वीज निर्मिती कंपन्याच्या शेअर्सची जोरदार विक्री झाल्याचे पाहण्यात आले. तर दुसरीकडे एफएमसीजी आणि खासगी बॅँकांच्या शेअर्समध्ये खरेदी विक्रीत समाधानकारक वातावरण दिसून आले. बँक निफ्टीत 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 26,503.3 वर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात दिग्गज शेअर्समध्ये टायटन ,इन्फोसिस, टाटा स्टील, वेदान्ता, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि सन फार्मा या कंपन्याच्या शेअर्समध्ये 5.5 ते 2.3 टक्क्यांवर अंक स्थिरावत बंद झाला. दिग्गज शेअरमध्ये येस बँक ,अल्ट्राटेक सिमेंट आयटीसी, एशियन पेन्टस, कोल इंडिया आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा याच्या शेअर्स 4 ते 1.3 टक्क्यांनी वधारल्याचे नोंदवण्यात आले.

मिडकॅप शअर्समध्ये आयडीबीआय बँक ,वक्रांगी, भारत फोर्ब्ज आणि ऍपोलो हॉस्पीटल या कंपन्याचे शेअर्स 7 ते 3.1 टक्क्यांची घसरणीसह बंद झालेत. तर मुथुट फायनान्स, एलआयसी हाऊसिंग  याच्या शेअर्स खरेदीत 3.1 ते 2 टक्क्यांची वाढ होत बाजार बंद झाला.