|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लंडनमधील मल्ल्याच्या घराची झडती घेता येणार

लंडनमधील मल्ल्याच्या घराची झडती घेता येणार 

लंडन / वृत्तसंस्था :

ब्रिटनच्या एका उच्च न्यायालयाने फरार भारतीय उद्योजक विजय मल्ल्याकडून थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱया भारताच्या 13 बँकांच्या समुहाच्या बाजूने निर्णय लागू करण्याचा आदेश दिला आहे. मल्ल्यावर बँकांकडून 9000 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. आदेशानुसार ब्रिटनच्या उच्च न्यायायाचे प्रवर्तन अधिकारी मल्ल्याच्या लंडननजीच्या हर्टफोर्डशायरमधील मालमत्तांमध्ये प्रवेश करू शकतील तसेच तेथे झडती घेण्याची अनुमती मिळाली आहे. भारताकडून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले जात आहेत.