|Sunday, August 25, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » आता फक्त 499 रूपयांमध्ये जिओफाय

आता फक्त 499 रूपयांमध्ये जिओफाय 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर आणली असून कंपनीने पोस्टपेड आणि जिओफाय डिवाईसवर कॅशबॅक ऑफर लागू केली आहे. या ऑफरनुसार जिओफाय हॉस्पॉट ग्राहकांना साधारण 499 रूपयांपर्यंत मिळणार आहे.

1,999 रूपयांच्या वेरिएंटवर ही ऑफर उपलब्ध नसून 500 रूपयांचा कॅशबॅक मिळवण्यासाठी युजर्सना 12 महिन्यांपर्यंत आपले पोस्टपेड बिल जमा करावे लागणार आहे. यानंतर 500 रूपयांचे कॅशबॅक क्रेडीट रूपात मिळेल.याचा उपयोग पुढची पोस्टपेड बील जमा करण्यासाठी होऊ शकतो.सध्या जिओ 199रूपयांचा पोस्टपेड प्लान देत आहे पण लवकरच इतर प्लान जारी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.