|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Automobiles » रॉयल एन्फील्डची नवी Pegasus बुकींगसाठी खुली

रॉयल एन्फील्डची नवी Pegasus बुकींगसाठी खुली 

ऑनलाईन टीम /  मुंबई :

 रॉयल एनफील्डच्या नव्या  Classic 500 Pegasus Edition बाईकचे बुकींग आजपासून सुरू करण्यात आले आहे. दिल्लीतील एका शोरूमने दिलेल्या माहितीनुसार या नव्या कोऱ्या मॉडेलची किंमत २.४० लाख रूपये इतकी सांगितली जात आहे. अत्यंत मर्यादित स्वरूपात उपलब्ध असलेल्या या मॉडेलचे बुकींग तुम्ही ऑनलाईनही करू शकता. प्राप्त माहितीनुसार भारतात या मॉडेलची केवळ २५० युनिट्सच विकली जाणार आहेत. तर, जगभरात या मॉडेल्सची केवळ १,००० युनिट्स विकली जातील.

Royal Enfield Classic 500 Pegasus Edition बाईक रॉयल एनफील्ड RE/WD 125 वर आधारलेली आहे. या बाईकला फ्लाईंग फ्ली (Flying Flea) नावानेही ओळखले जाते. Flying Flea ला ब्रिटीश पॅराट्रूपर्स वर्ल्ड वॉर २च्या दरम्यान वापरले जात असे. या बाईकच्या ऑनलाईन बुकींग नंतर एक यूनीक कोड जनरेट होईल आणि त्याच्या माध्यमातूनच लॉगइन करून आपण ही बाईक खरेदी करू शकाल.