|Friday, March 22, 2019
You are here: Home » उद्योग » दिवसभरातील चढ-उताराने बाजारात घसरण

दिवसभरातील चढ-उताराने बाजारात घसरण 

निफ्टी 10,923 वर सेन्सेक्स 36,265 पातळीवर

वृत्तसंस्था/ मुंबई

बुधवारी शेअर बाजारात चढ -उताराचे  वातावरण राहील्यामुळे घसरणीसह बाजार बंद झाला. सेन्सेक्स 0.07 आणि निफ्टी 0.01 टक्यांची घसरण नोंदवण्यात आली. व्यवहारामध्ये निफ्टी 10,923  पोहोचली तर सेन्सेक्स 36,169.70 वर पोहोचत बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. बीएसईच्या मिडकॅपचा निर्देशांक 0.7 टक्क्यांने घसरण झाली. निफ्टीतील मिडकॅप 100 निर्देशांकासह  0.5 तुटत बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशाक 0.3 टक्क्यांची कमजोरी दिसून आली.

बीएसईच्या 30 मुख्य कंपन्यामधील समभागातील सेन्सेक्स 26.31 अंकावर 0.07 टक्के वाढ होत. 36.265.93 वर बंद झाला. एनएसई मधील मुख्य 50 कंपन्याच्या समभागातील 1.05 अंकानी म्हणजेच 0.01 टक्क्यांनी वाढ नोंदवत बंद झाला.

बाजारात धातू, औषध , पीएसयु बँक रियल्टी आणि कॅपिटल गुड्स आणि ऑईल वीज निर्मीती या कंपन्यामधील शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. तर एफएमसीवी ,आयटी, आणि रियल्टी कंपन्याच्या समभागाची कमी खरेदी नोंदवण्यात आली.

दिग्गज कंपन्यामध्ये टीसीएस ,इन्फ्राटेल ,इन्फोसिस, एचसीएल टेक आणि इचयुएल यांच्या शेअर्समध्ये 6.06-2.01 टक्यांची खरेदी वधारत बाजार बंद झाला. कोल इंडिया, वेदान्ता, हिडाल्को, टायटन आणि टाटा मोटर्स या कंपन्याच्या शेअर्समध्ये 5.04 ते 2.69 टक्यांवर अंक स्थिर होत बंद झाला.

मिडकॅप शेअर्स असणाऱया अदानी पॉवर, आयडीबीआय बँक ,टिव्हीज लॅब यांच्या  खरेदीत 147.87 ते 2.18 टक्के मजबुत होत बंद झाला. तर मिडकॅप शेअर्स बँक ऑफ इंडिया युपीएल, वक्रांगी , सेल आणि रॅमको सिमेंट या कंपन्यामध्ये 5.2 ते 4.79  तुट नोंदवण्यात आली. स्मॉलकॅप शेअर्समधील कंपन्यामध्ये शालीमार पेन्ट्स आणि सिरायक्स सिल्क 10.40 ते 5.89 टक्यांनी वाढ होत बाजार बंद झाला.

Related posts: