|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गोकुळ, वारणाच्या दूध बंदीचा सीमाभागातील शेतकऱयांना फटका

गोकुळ, वारणाच्या दूध बंदीचा सीमाभागातील शेतकऱयांना फटका 

गायीचे दूध घेणे बंद केल्यामुळे शेतकऱयांसमोर संकट

बेकिनकेरे :

 महाराष्ट्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱया गोकुळ व वारणा दूध उत्पादक सहकारी संघांनी गायीचे दूध घेणे बंद केल्यामुळे सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सीमाभागात शेती हा मुख्य व्यवसाय असून वाढता जाणारा खर्च व योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाकडे वळला आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात दुभत्या गायी-म्हशींचे पालन करत असतो. हे दूध संकलन करण्यासाठी प्रत्येक गावोगावी दूध सकंलन केंद्रे (डेअरी) आहेत. या माध्यमातून दूध संकलन करून महाराष्टातील दूध संस्थाना ते पाठविले जाते. मात्र आता या संस्थानी गायीच्या दुधाला फॅट नाही, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गायीच्या दुधाच्या पावडरची उचल होत नाही अशी कारणे देत सीमाभागातील दूध घेणे बंद केल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱयांना गायीच्या दुधाचे काय करावे, हा प्रश्न पडला आहे. तर काही शेतकऱयांवर गायी विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना अनेक आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.

दूध संकलनासाठी सुरू असलेल्या केंद्रात दररोज 200 ते 250 लिटरचे दूध जमा होते. मात्र गायीचे दूध घेणे बंद केल्यामुळे या दुधाचे काय करावे हा प्रश्न  दूध डेअरी संचालकांना भेडसावत आहे. या केंद्राबरोबरच दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत.

Related posts: