|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » टाटाकडून स्पोर्ट्स एसयुव्हीचे नामकरण

टाटाकडून स्पोर्ट्स एसयुव्हीचे नामकरण 

वृत्तसंस्था /मुंबई :

टाटा मोटर्सकडून सादर करण्यात आलेल्या नवीन स्पोर्ट्स युटिलिटी कार एसयुव्हीचे नामकरण ‘हॅरियर’ करण्यात आले आहे. यात जॅग्वार लॅडरोव्हर मिळून विकसित करण्यात आले आहे. 5 सिटर एसयुव्ही न्यू जनरेशन तयार करण्यात  आल्याचे सांगण्यात आले. या कारला ऑटो एक्सपो 2018 मध्ये एच5एक्स या नावानी सादर करण्यात आले होते. तरी या कारचे व्यावसायिक लाँचिंग 2019 च्या पहिल्या तिमाहीत करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

हॅरियर कार दिसायला स्पोर्ट्स आणि डायनॅमिक लुक देणारी आहे. स्टायलिश, तंत्रज्ञान आणि सादरीकरण क्षमता या कारणामुळे टाटा मोटर्स भविष्यातील पिढीला आकर्षक निर्माण करित असल्याचे दिसून येत आहे.

टाटा मोटर्स एप्रिल ते मे या तिमाहीत सर्वात मोठी विक्रीची नेद करण्यात आली आहे. या काळात 58,969 युनिटची विक्री करण्यात आली. एक वर्ष अगोदर 39,708 युनिट होती. यंदा यात 48.5 टक्के वाढ दर्शवण्यात आली आहे.

टर्नओव्हर 2.0 टक्क्यांसोबत बाजारातील स्थान मजबुत करण्यावर भर दिला जाणार आहे. तर 2019 मध्ये हॅरियर कार ग्राहकांच्या करिता उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती टाटा मोटर्सचे प्रवासी कारचे अध्यक्ष मयंक पारीख यांनी दिली आहे.