|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » 2060 पर्यंत जगाच्या निम्मे भारत, चीनमध्ये उत्पादन

2060 पर्यंत जगाच्या निम्मे भारत, चीनमध्ये उत्पादन 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय पातळीवरील बदलत्या परिस्थितीचा भारत, चीनला लाभ होणार, असे अहवालात म्हणण्यात आले. या देशांतील सर्वात तरुण लोकसंख्या आणि सार्वजनिक खर्च अधिक होत असल्याने त्याचा भविष्यात या देशांना लाभ होईल. मात्र याला व्यापार युद्ध बाधा ठरू शकते, असे म्हणण्यात आले.

2060 पर्यंत गुंतवणूक, नवीनता आणि आंतरराष्ट्रीय संरक्षणवादाचा लाभ भारत आणि चीनला होईल. पुढील 40 वर्षानंतर अनेक देशांत रोबोचा कामांसाठी वापर करण्यात येईल. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग घटेल, असे सांगण्यात आले. पुढील वर्षी 3.4 टक्के विकास दराचा अंदाज असून पुढील दशकभरात तो 2 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. याचे प्रमुख कारणे मोठय़ा उभारत्या अर्थव्यवस्था आणि लोकसंख्येचे वाढते वय ही आहेत. याचबरोबर आर्थिक केंद्र आशियाकडे वळत भारत आणि चीनमधून संपूर्ण जगाच्या निम्मे उत्पादन या दोन देशांत होईल असे सांगण्यात आले.

Related posts: