|Sunday, August 25, 2019
You are here: Home » क्रिडा » ब्रेथवेटचे शतक, हेटमेयरचे अर्धशतक

ब्रेथवेटचे शतक, हेटमेयरचे अर्धशतक 

वृत्तसंस्था/ किंग्स्टन

पेग ब्रेथवेटने झळकवलेले शतक आणि शिमरन हेटमेयरचे नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर विंडीजने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱया व शेवटच्या कसोटीच्या पहिल्या दिवशीअखेर 92 षटकांत 4 बाद 295 धावा जमविल्या होत्या.

गेल्या अँटिग्वा येथे झालेल्या पहिल्या कसोटीतही ब्रेथवेटने शतक झळकवले होते आणि विंडीजने डावाने विजय मिळविला होता. येथील सामन्यात त्याने 110 धावा जमवित आठवे कसोटी शतक नोंदवले. हेटमेयरने आक्रमक खेळ करीत 98 चेंडूत 9 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 84 धावा फटकावल्या होत्या. चौथ्या गडय़ासाठी ब्रेथवेट व हेटमेयर यांनी 109 धावांची भागीदारी केली. त्याआधी कीरन पॉवेंलने 29 धावा जमविताना दुसऱया गडय़ासाठी बेथवेटसमवेत 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ब्रेथवेटला शाय होपनेही चांगली साथ दिली. या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 79 धावांची भागीदारी केली. तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर तो 29 धावांवर झेलबाद झाला. बांगलादेशतर्फे मेहिदी हसनने 3 बळी मिळविले. पहिल्या सत्रात बांगलादेशच्या स्पिनर्सनी अप्रतिम मारा करीत विंडीज फलंदाजांना जखडून ठेवले होते. या सत्रात 35 षटकांत त्यांना केवळ 33 धावा जमविता आल्या होत्या. 2104 नंतर विंडीजला मायभूमीत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यावेळीही त्यांनी बांगलादेशवरच 2-0 असा विजय मिळविला होता.