|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » भाजपाचे संपर्क अभियान जोमात

भाजपाचे संपर्क अभियान जोमात 

पुरुषोत्तम जाधव यांनी काढला जिल्हा पिंजून  विक्रम पावसकर यांची साथ मोलाची

प्रतिनिधी/ सातारा

भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जिह्यात संपर्क अभियान राबवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार सातारा जिह्यात भाजपाचे सध्या संपर्क अभियान फर्मात आहे. अगदी ग्रामीण भागातील शेतकऱयांपासून शहरी भागातील उद्योजकांपर्यंत भेटी देवून त्यांना भाजपा सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती दिली जात आहे. या अभियानात भाजपाचे पुरुषोत्तम जाधव यांनी तर अक्षरशः जिल्हा पिंजून काढला आहे. त्यांना जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी साद दिली आहे. त्यामुळे सध्या भाजपाच्या जनसंपर्क अभियानांचीच सगळीकडे चर्चा सुरु आहे.

भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरुन जनसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश आले. त्यानुसार जिह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱयांकडून हे अभियान राबवले जात आहे. त्यानुसार लोकसभेची दोन वेळा निवडणूक लढवलेले पुरूषोत्तम जाधव यांनी मात्र या अभियानाच्या माध्यमातून जोरदार मुसंडी मारली आहे. अगदी कराड तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱयांपासून महाबळेश्वर तालुक्यातील ऍग्रो टुरिझमचे धनावडे यांना भेटून त्यांना भाजपाने राबवलेल्या चार वर्षातील योजनांची माहिती दिली. तसेच सातारा शहरातील अनेकांनाही भेटून माहिती दिली. माहुली येथेही त्यांनी हे अभियान राबवले आहे. त्यांच्या या अभियानामध्ये इतर पक्षांच्या पदाधिकाऱयांनाही भेटून त्यांनी भाजपाने काय-काय केले त्यांची माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्याच या अभियानाची चर्चा सुरु आहे. वारकऱयांसाठी मोफत औषधोपचाराची सेवा सुरु आहे. पंढरीच्यावारीत लाखो वारकरी भक्तीभावाने सहभागी होत असतात. त्याच वारकऱयांची सेवा करण्यासाठी मोफत औषधोउपचार करण्याकरता आळंदी येथूनच पुरुषोत्तम जाधव यांनी दोन रुग्णवाहिका, सोबत दोन डॉक्टर दिले आहेत. ते वारीतच आहेत. त्यांच्या या अनोख्या सेवेचीही जिह्यात चर्चा सुरु झाली आहे.

वारकऱयांना दिल्या जाणार सोयीसुविधा

भाजपाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जिह्यात संपर्क अभियान राबवण्याच्या सूचना दिल्या गेल्यामुळे त्यानुसार सातारा जिह्यात भाजपाचे सध्या संपर्क अभियान फर्मात आहे. त्यामुळे जिह्यातील सर्वच नेत्यांनी यात पुढाकार घेत जनसंपर्क अभियान मोठय़ा शिताफीने पूर्ण करण्याचे ठरविले असून पंढपूरच्या वारीमध्ये वारकऱयांना विविध सेवा पुरविल्या जाणार असून यामध्ये अन्नधान्य, त्याचबरोबर औषधोपचार या सुविधा देखील दिल्या जाणार आहेत.

Related posts: