|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » छत्री दुरूस्तीचा व्यवसाय तेजीत

छत्री दुरूस्तीचा व्यवसाय तेजीत 

प्रतिनिधी/ सातारा

पावसाला सुरूवात झाल्याने छत्री, रेनसूटला मागणी वाढू लागली आहे. तर काहींनी आपल्या जुन्याच छत्र्या दुरूस्त करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. यामुळे सध्या शहरात छत्री दुरूस्ती करणाऱया व्यावसायिकांचा धंदा तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पावसाळ्यात छत्रीचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. शहरात खराब झालेली छत्री दुरूस्त करण्यासाठी विविध ठिकाणी व्यावसायिक बसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच हे व्यावसायिक खेडोपाडय़ात जाऊन छत्र्या दुरूस्तीचे काम करताना दिसत आहेत. त्याचबरोबर काही ग्राहक आपल्या जुन्या छत्र्या दुरूस्ती करून अनेक जण त्याच छत्र्या वापरताना दिसत आहेत, तर काही जण नवीन छत्र्या खरेदी करत आहेत. तसेच विविध प्रकारच्या छत्र्या बाजारात येत असल्याने तरूणांना त्याचे आकर्षण बनल्याने नवनव्या छत्रींची खरेदी मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. 120 रूपयांपासून बाजारात छत्री विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नव्या छत्री खरेदीमुळे जुनी छत्री दुरूस्ती करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Related posts: