|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » एका कलाकाराचा 31 दिवसांचा प्रवास

एका कलाकाराचा 31 दिवसांचा प्रवास 

 

 होम स्वीट होमच्या फर्स्ट लूकमध्ये शहरातील प्रशस्त इमारतीमधील आणि गावातील एका जुन्या धाटणीचे घर दिसत आहे. त्याच्या सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची घराचे वर्णन करणारी सुंदर कविता आहे ती सुद्धा त्यांच्याच आवाजात कवितेत घर, आसपासचे दरी डोंगर, घराचा उंबरठा, अंगण, सभोवतालची हिरवळ, त्रिकोणी छप्पर, काटेरी कुंपण असे सहज सुचणारे साधे- सोपे शब्द मनाला अलगद भिडणारे आहेत. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाचे निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर, विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी यांनी केले असून दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात कोणते कलाकार आहेत? आणि या चित्रपटामध्ये नक्की काय आहे? हे जाणून घेण्याविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे. घर आणि त्याचे घरपण हे आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातील एका घराची प्रतिमा दडलेली असते. कुणाला घर म्हणून प्रशस्त इमारतीमध्ये फ्लॅट हवा असतो, तर कुणाला घरासमोर अंगण हवं असतं. घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं आणि सर्वांचं आपलं घर हे होम स्वीट होम असतं. होम स्वीट होम हा चित्रपट 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

एका कलाकाराचा 31 दिवसांचा प्रवास

31 दिवस… का?, कशासाठी?, अशा अनेक गोष्टी चित्रपटाचं शीर्षक ऐकताच क्षणी मनात येतात. फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी एस बाबू निर्मित, उमेश जंगम लिखित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित 31 दिवस चित्रपट येत्या 20 जुलै 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाची उत्कंठा वाढवणाऱया या ट्रेलरमध्ये अभिनेता शशांक केतकर, मयुरी देशमुख आणि रीना अगरवाल हे अनोखं त्रिकूट प्रेक्षकांना पाहायला मिळणार.

 या चित्रपटाची कथा मकरंद आणि त्याच्या कला क्षेत्राशी निगडीत असलेल्या स्वप्नाविषयी आहे. जिद्दीने आपल्या इच्छांचा स्वप्नांचा पाठलाग करताना कितीही मोठय़ा अडचणी आल्या तरीही न कोलमडता निर्धाराने पुढे जाणारा हा तरुण आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्याचबरोबर पदार्पणात पहिला चित्रपट करताना तो एंटरटेनिंग असण्यासोबत मोटिव्हेशनल देखील असावा अशी धारणा दिग्दर्शक आशिष भेलकर यांची आहे.  बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भंडारकर, प्रभुदेवा आणि रेमो डिसुझा यांच्या चित्रपटांचे सहदिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करून आता मराठीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. 31 दिवस चित्रपटात राजू खेर, विवेक लागू, सुहिता थत्ते, आशा शेलार, अरुण भडसावळे आणि नितीन जाधव यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा उमेश जंगम, छायांकन अनिकेत खंडागळे, संकलन देवेंद्र मुरुडेश्वर, नफत्य दिग्दर्शक वफषाली चव्हाण, स्टंट डिरेक्शन रोहित शेट्टी फेम सुनील रॉड्रिक्स यांनी केलं आहे. मकरंदच्या स्वप्नांचा डोलारा असा काही कोसळतो की नव्याने काही सुरुवात होईल ही शक्यताच दाट काळोखात विरून जाते. मात्र, त्याच्या आयुष्यातील मुग्धा (मयुरी देशमुख) आणि मीरा (रीना अगरवाल) त्याच्या आधार बनतात. या चित्रपटाचं संगीत चिनार- महेश या प्रसिद्ध जोडीने दिलं आहे. गायक हर्षवर्धन वावरे, हृषिकेश रानडे, कीर्ती किल्लेदार आणि वैशाली माडे यांनी चित्रपटातील गाणी गायली असून गीतकार मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केली आहेत. बाहुबली चित्रपटात दाखवलेल्या केरळातील अथिरापल्ली धबधब्यावर पहिल्यांदाच या चित्रपटातील मन का असे… हे गाणं चित्रित झालं आहे.

Related posts: