|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले

चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले 

वार्ताहर / वारणावती

चांदोली धरणाचे दरवाजे उघडल्याने वारणा नदी पात्राबाहेर पडली. यामुळे नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. चांदोली धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिणामी पाण्याने सांडवा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आज सकाळी दहाचया  सुमारात धरणाचे चारही दरवाजे 1.25 मिटर उचलून 2100  क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. वीजनिर्मिती केंद्रातून 592 व  उच्च स्तर द्वारातून 800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सर्व मिळून 3900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे  मुसळधार पाऊस त्यातच धरणातून सुरू केलेला विसर्ग वीजनिर्मिती केंद्रातून येणारे पाणी यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर गेले आहे. नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे. दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा  प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 45 दिवस म्हणजे दीड महिना अगोदरच धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 810 मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा त्याचे प्रमाण 1324 मिलीमीटर इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 514 मिलिमीटर पाऊस अधिक बरसला आहे.

Related posts: