|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » दुध पुरवठा सुरळीत राहिल, तुटवडा निर्माण होऊ देणार नाही : मुख्यमंत्री

दुध पुरवठा सुरळीत राहिल, तुटवडा निर्माण होऊ देणार नाही : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / नागपूर :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर पुकारण्यात आलेल्या दुध आंदोलनाचे परिणाम ग्राहकांना आज जरी जाणवत नसले तरी उद्या ग्राहकांसाठी अडचण निर्माण होऊ शकते. परंतु दुध पुरवठा सुरळीत राहिल, तुटवडा निर्माण होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

दुधाला प्रतिलिटर पाच रूपयांची दरवाढ द्यावी, यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपुरात विठ्ठाला दुग्धाभिषेत घालत दूध आंदोलन सुरू केले. अनेक शहरांना होणारा दूधपुरवठा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्याकर्त्यांनी रोखला. पुणे, सातारा,सांगली, औरंगाबाद परिसरात मोठय़ा प्रमाणावर दुधाचा पुरवठा थांबवण्यात आला आहे.