|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जोतिबा-गिरोली घाट मार्गावर कोसळणाऱया दरडी धोकादायक

जोतिबा-गिरोली घाट मार्गावर कोसळणाऱया दरडी धोकादायक 

प्रतिनिधी/ वारणानगर

 जोतिबा ते गिरोली घाट मार्गावर कोसळणाऱया दरडीमुळे  घाट मार्ग बिकट बनला आसुन प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.

जोतिबा डोंगर ते गिरोली मार्गावर रस्त्याकडेला असणाऱया उंच डोंगरातून मोठमोठे दगड निसटून ते रस्त्याच्या कडेला आले आहेत. दगडाबरोबर मातीचा ढिगारा ही रस्त्यावर येणाच्या मार्गावर आहे. गेले अनेक दिवस या मार्गावरील दगड उत्खलन चालू आहे.

 पायथ्यांचे दगड काढल्याने उंच टेकडीवरील दगड निसटू लागले आहेत. या मार्गावरून सादळे मादळे कासारवाडी मार्गे पुणे बेंगलोर हायवेला जाता येते. सध्या प्रवाशी संख्या वाढली आहे. मुंबई, पुणे, सातारा, कराड भागातील प्रवाशी या शॉर्टकट मार्गेच येतात. जोतिबा डोंगरच्या पहिल्याच घाट वळणावर दरड कोसळली आहे. पावसाचा मारा आणि वाऱयाच्या संगतीला असणाऱया दाट धुक्मयातून प्रवास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते.

घाटमार्गामध्ये आता या दरडी कोसळण्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. पोहाळे मार्गावर ठिकठिकाणची दरड कोसळून रस्त्याकडेला ढिग पडले आहेत. मोठा अनर्थ टाळण्यासाठी वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे.