|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. विरोधी पक्षांना एकत्र करून मोदी सरकारवर लोकसभेत अविश्वास प्रस्तावाचे दडपण आणण्याचा इरादा काँग्रेसने जाहीर केला आहे. या आव्हानाला सामेरे जातान मोदी सरकार कोणत्या डावपेचांच अवलंब करते, याकडे विरोधकांचे लक्ष लागलेले आहे.

संसदेचे कामकाज नीट चालविण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत केले. पण, सर्वपक्षीय बैठकीत जे ठरते त्याचे पालन सभागृहांमध्ये होत नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव दाखल करून घेण्यावरून तेरा दिवसांच्या गोंधळामुळे कामकाज बंद पडले होते. हे कामकाज विरोधी पक्षांनी ठप्प केले नव्हते आणि उद्यापासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात आपल्यावर हा ठपका ठेवला जाणार नाही, अशी रणनिती विरोधी पक्षांनी आखली आहे. चार वर्षांच्या सत्तेदरम्यान सर्व आघाड्यांवर निष्प्रभ ठरलेल्या मोदी सरकारविरुद्ध शेतकऱयांची दुरवस्था, महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, जम्मू आणि काश्मीरमधील राज्यपाल राजवट, हिंसक झुंडीकडून होणाऱया निरपराधांच्या हत्या, ऍट्रोसिटी कायदा, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका, स्वीस बँकांमधील भारतीयांच्या पैशात 50 टक्क्मयांनी झालेली वाढ या मुद्यांवर एकत्रितपणे चर्चा करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव हाच उत्तम पर्याय असल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेनेही महागाई, शेतकऱयांचे प्रश्न, काश्मीरमधील परिस्थिती आणि वाढत्या बेरोजगारीवर विरोधी पक्षांना पाठिंबा देण्याचा पवित्रा घेतला आहे.

 

Related posts: