|Friday, March 22, 2019
You are here: Home » उद्योग » गुगलला युरोपियन महासंघात 34,288 कोटी रुपयांचा दंड

गुगलला युरोपियन महासंघात 34,288 कोटी रुपयांचा दंड 

ऍन्ड्रॉईडसाठी केले नियमांचे उल्लंघन

वृत्तसंस्था/ बुसेल्स

ऍन्ड्रॉईड ऑपरेटिंग प्रणालीमध्ये आपलेच वर्चस्व कायम रहावे यासाठी गुगलने नियमांचे उल्लंघन केल्याने युरोपियन महासंघाकडून विक्रमी 34,288 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. युरोपियन महासंघातील हा सर्वात मोठा दंड ठरला. अमेरिकन कंपनी गुगलने ऍन्ड्रॉईड ऑपरेटिंग प्रणालीमधील सर्च इंजिन आणि ब्राऊझरच्या साहाय्याने या क्षेत्रात स्वतःची मक्तेदारी टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले असे महासंघाच्या स्पर्धा आयुक्त मार्ग्रथ वेस्तागर यांनी म्हटले.

तीन वर्षे या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड्र ट्रम्प यांनी युरोपातील स्टील आणि ऍल्युमिनियमच्या आयातीवर कर लादल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने व्यापार युद्ध अधिकच भडकण्याची शक्यता आहे.

युरोपियन महासंघात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने गुगलला 3.34 अब्ज युरोचा (5 अब्ज डॉलर) दंड लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला. कंपनीच्या स्वतःचा लाभ होण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले आहे. गुगलने 90 दिवसांत हे कृत्य बंद करावे अथवा दंडाचा रक्कम जमा करावी, असे वेस्तगर यांनी सांगितले. यापूर्वी 2017 मध्ये युरोपियन महासंघात गुगलला 2.4 अब्ज युरोंचा दंड ठोठावण्यात आला होता. आता ही रक्कम साधारण दुप्पट आहे.

Related posts: