|Thursday, April 18, 2019
You are here: Home » उद्योग » टाटा, हय़ुंदाई कार महागणार

टाटा, हय़ुंदाई कार महागणार 

नवी दिल्ली

 हय़ुंदाई मोटार इंडियाने ग्रॅन्ड आय10 या कारच्या किमतीत 3 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने किंमत वाढल्याचे सांगण्यात आले असून ऑगस्ट महिन्यापासून नवीन किमती लागू होतील. याचप्रमाणे टाटा मोटर्सनेही प्रवासी कार किमतीत 2.2 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला. कंपनीने यापूर्वी एप्रिलमध्ये कार किमतीत 3 टक्क्यांनी वाढ केली होती. कारच्या किमतीत वाढ केली तरीही विक्री वाढतच राहील असा कंपनीला विश्वास आहे. उत्पादन खर्चात वाढ होणे कायम असल्याने हा निर्णय घ्यावा लागला, असे सांगण्यात आले.

Related posts: