|Monday, October 15, 2018
You are here: Home » उद्योग » सरकारी स्टील कंपनीतील कर्मचाऱयांना निवृत्तीवेतन योजना

सरकारी स्टील कंपनीतील कर्मचाऱयांना निवृत्तीवेतन योजना 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सार्वजनिक क्षेत्रातील स्टील कंपन्यांतील कर्मचाऱयांना निवृत्तीवेतन देण्यास स्टील मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली. सरकारच्या या निर्णयाचा लाभ सध्या कार्यरत असणाऱया 94 हजार आणि निवृत्त 56 हजार कर्मचाऱयांना होईल. महारत्न असणाऱया स्टील ऍथॉरिटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, एमएसटीसी, फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड, मेटालुर्जिकल ऍण्ड इंजिनिअरिंग कन्सल्टन्ट आणि कुंद्रेमुख आयर ऑर कंपनीच्या कर्मचाऱयांना नवीन योजनेचा लाभ होईल. या निर्णयाने सरकारी तिजोरीवर प्रतिमहिना 45 कोटी (प्रतिवर्षा 540 कोटी) रुपयांचा भार पडेल, असे सरकारने सांगितले.

Related posts: