|Friday, March 22, 2019
You are here: Home » उद्योग » शेअरबाजाराचा शेवटच्या क्षणी ‘यु-टर्न’

शेअरबाजाराचा शेवटच्या क्षणी ‘यु-टर्न’ 

प्रतिनिधी/ मुंबई

बाजाराच्या प्रारंभी सेन्सेक्सने आपला इन्ट्राडेचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. मात्र विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणल्याने सत्रातील तेजी गमावली. निफ्टीही 11 हजारच्या खाली बंद झाला.

सेन्सेक्समध्ये 300 अंकाची तेजी आल्याने 36,747 हा इन्ट्राडेची उच्चांक पातळी गाठली होती. मात्र लोकसभेत विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणल्याने अखेरपर्यंत 146 अंकाने कोसळत 36,373 वर बंद झाला. बाजारात तरलता आल्याने सेन्सेक्समध्ये 427 अंकाचा बदल दिसून आला. एनएसईचा निफ्टी 27 अंकानी उतारत 10,980 वर स्थिरावला.

राजकीय घडामोडी आणि तिमाही निकाल जाहीर करण्यात येत असल्याने नफा कमाई होण्याची शक्यता आहे. धातू, रिअल्टी, दूरसंचार आणि वाहन निर्देशांकात विक्री दिसून येत आहे. धातू निर्देशांकात सर्वाधिक कमजोरी आली असून टाटा स्टील 5.22 टक्क्यांनी घसरला.

सकाळच्या सत्रातील तेजी कायम ठेवण्यास बाजाराला अपयश आले. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. शुक्रवारी अविश्वास ठरावासंबंधी चर्चा होणार असल्याने तोपर्यंत दबाव दिसेल असे गिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले.

सेन्सेक्समध्ये वेदान्ता 2.74 टक्के, ऍक्सिस बँक 2.57 टक्के, हिंदुस्थान युनि 2.37 टक्के, टाटा मोटर्स 2.19 टक्क्यांनी घसरले. ओएनजीसी 2.69 टक्के, एशियन पेन्ट्स 0.95 टक्के, येस बँक 0.92 टक्के, एचडीएफसी 0.91 टक्क्यांनी घसरले.

निर्देशांकांची कामगिरी पाहता धातू निर्देशांक 3.12 टक्के, रिअल्टी 2.42 टक्के, दूरसंचार 1.82 टक्के, वाहन 1.36 टक्के, बँन्केन्स 0.66 टक्क्यांनी कमजोर झाले. तेल आणि वायू व ऊर्जा निर्देशांक 1.07 टक्क्यांपर्यंत वधारले. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.27 टक्क्यांनी घसरला.

Related posts: