|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » ऊस उत्पादक शेतकऱयांना दिलासा, एफआरपीत वाढ

ऊस उत्पादक शेतकऱयांना दिलासा, एफआरपीत वाढ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रतिक्विंटर 20 रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेत देशभरातील शेतकऱयांना दिवासा दिला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता ऊसाला प्रतिक्विंटल 275 रूपयांचा एफआरपी मिळू शकणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऊसाच्या एफआरपीत प्रतिक्विंटल 20 रूपयांची वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव अन्न आणि ग्राहक मंत्रालयाने कॅबिनेटकडे पाठवला होता. एफआरपीचा हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट स्वीकारला आहे. त्यामुळे ऊसाच्या एफआरपीत प्रतिट 200रूपयांची वाढ झाली आहे.