|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सुशीलकुमारांना कार्यकारिणीत डावलल्याचा कार्यकर्त्यांकडून निघाला संताप

सुशीलकुमारांना कार्यकारिणीत डावलल्याचा कार्यकर्त्यांकडून निघाला संताप 

प्रतिनिधी / सोलापूर :

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांना काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान न दिल्याने गुरूवारी सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनात एकत्रित येत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधींचा व यांच्या टीमचा निषेध व्यक्त केला गेला. संतापाचा उद्वेगातून कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात राडा घालत येथील कुंडय़ा फोडून टाकल्या काँग्रेस भवनासमोर निषेधात्मक घोषणाबाजी केली.   तसेच शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्याकडे आपले राजीनामे सामुहिकरित्या सादर केले.

   काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी यादी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये सोलापूरचे सुपूत्र आणि देशाचे काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नाव वगळण्यात आले. यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास काँग्रेसभवन मध्ये एकत्रित येत सुशिलकुमार शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरूवात केली.

   त्यानंतर शिंदेना डावलल्याबद्दल कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आपला संताप व्यक्त केला. शिंदे यांनी काँग्रेस पक्षाची अनेक वर्षी सेवा केली असून त्यांच्या मार्गदर्शनाची पक्षाला गरज आहे. त्यांचे कार्य युवकांना प्रेरक असून त्यांचा समावेश कार्यकारिणीत झाला पाहिजे, अशी मागणी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची होती. काँग्रेस भवनाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी नंतर चार कुंडय़ा फोडून आपला राग व्यक्त केला.