|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सदृढ समाज निर्माण आमचे ध्येय

सदृढ समाज निर्माण आमचे ध्येय 

बेळगाव / प्रतिनिधी :

सदृढ समाज निर्माणासाठी मुलांमधील कुपोषितपणा निवारण्यासाठी मुलांना राष्ट्रीय जंत निवारण कार्यक्रमांतर्गत (1 ते 19 वयोगटातील) जंत निवारण गोळय़ा देण्यात याव्यात, अशी सूचना जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर. यांनी समन्वय समितीच्या बैठकीत दिली. जि. पं. च्या व्हीडिओ कॉन्फरन्स कक्षात  गुरुवारी राष्ट्रीय जंत निवारण कार्यक्रम अंमलबजावणीबाबत विशेष खात्यांच्या जिल्हास्तरीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सीईओ रामचंद्रन आर. यांनी सूचना केली.

10 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जंत निवारण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण जिल्हय़ात 1 वर्षाच्या बालकापासून 19 वर्षांच्या युवकवर्गाला अंगणवाडी, शाळेमध्ये जंत निवारक ऍल्बेंडाजोल-400 गोळय़ा देण्यात येणार आहेत. शाळेपासून दूर राहिलेल्या मुलांनाही दि. 17 ऑगस्ट रोजी आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांद्वारे गोळय़ांचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्हय़ात पहिल्या टप्प्यात गोळय़ापासून वंचित राहिलेल्या मुलांना आणि युवावर्गाला दुसऱया टप्प्यात दि. 24 ऑगस्ट रोजी या गोळय़ा देण्यात येणार आहेत. अंदाजे 13 लाख 90 हजार मुलांना या गोळय़ा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे जि. पं. सीईओ रामचंद्रन आर. यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते, महिला आणि बाल कल्याण खाते, समाज कल्याण, शिक्षण आणि अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. 

Related posts: