|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News » वाहतुकदारांच्या संपाचा राज्याला फटका

वाहतुकदारांच्या संपाचा राज्याला फटका 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या नेतृत्वाखाली मालवाहतुकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनाचा फटका मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी बसताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशननेही या वाहतुकदारांच्या संपात उडी घेतल्याने त्याचे पडसाद मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरांमध्ये दिसून येत आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जीएसटीअंतर्गत आणा, इंधन दरांची सातत्याने होणारी वाढ थांबवा, टोलदरातून सवलत द्या आदी विविध मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ट्रक, टेम्पोंच्या संपामुळे भाजीपाला तुडवडय़ाची शक्यता आहे. पावसामुळे आधीच गगनाला भिडलेले भाजीचे दर या संपामुळे आणखी वाढू शकतात.

 

Related posts: