|Monday, October 22, 2018
You are here: Home » leadingnews » विरोधी पक्षांनी धोरण आखून आघाडी करणे आणि वैयक्तीक महत्त्वाकांक्षा दूर ठेवणे गरजेचे आहे-सोनिया गांधी

विरोधी पक्षांनी धोरण आखून आघाडी करणे आणि वैयक्तीक महत्त्वाकांक्षा दूर ठेवणे गरजेचे आहे-सोनिया गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. याचा प्रत्यय काँग्रेस कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत दिसून आला आहे. ‘आरएसएसच्या संघटनात्मक आणि आर्थिक शक्तीचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी धोरण आखून आघाडी करणे आणि वैयक्तीक महत्त्वाकांक्षा दूर ठेवणे गरजेचे आहे. मोदी सरकारची उलटगणती सुरू झाली असून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना केलेल्या भाषणावरून स्पष्ट झाले आहे’, असे वक्तव्य काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे.

यावेळी त्या म्हणाल्या, आम्हाला लोकशाहीच्या वाईट काळात लोकांना वाचवण्याचे काम करावे लागणार असून काँग्रेस आघाडी मजबूत करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आम्ही आहोत अशी भूमिकाही गांधी यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदींचे सरकार धोकादायक आहे. देशातील लोकांना यापासून वाचवायचे आहे. लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे. नागरीक भीतीच्या वातावरणात जगत आहेत आणि देशात गरीबी वाढत आहे. मोदी सरकारच्या अखेरच्या घटका सुरू झाल्या असून आम्ही आघाडी करण्यासाठी तयार आहोत. संपूर्ण काँग्रेस पक्ष राहुल गांधींना साथ द्यायला तयार आहे. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्या बोलता होत्या.

या बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी राहुल गांधी यांना संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. सामाजिक समता आणि आर्थिक विकासाची गाडी पुन्हा रूळावर आणण्यासाठी काँग्रेस पक्ष राहुल यांच्या पाठिशी राहील असे आश्वासन डॉ. सिंग यांनी राहुल यांना दिले.

Related posts: