|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्र्यांचा पिंपरी दौरा, मराठा मोर्चाचे 25-30 कार्यकर्ते ताब्यात

मुख्यमंत्र्यांचा पिंपरी दौरा, मराठा मोर्चाचे 25-30 कार्यकर्ते ताब्यात 

ऑनलाईन टीम / बीड :

क्रांतीवीर दामोदर हरी चाफेकर संग्रहालयाच्या इमारतीचं भूमीपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिंचवडला पोहोचणार असल्याने या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मराठा आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे. वाकड पोलिसांनी आतापर्यंत 25 ते 30 मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले असून कार्यक्रमस्थळी सुमारे 500 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

मराठा समाजाला आरक्षण देण्याची तात्काळ घोषणा करावी आणि राज्यात होऊ घातलेल्या मेगा भरतीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आंदोलने सुरू केली आहेत. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळणही लागले आहे. या आंदोलकांनी दिलेल्या इशाऱयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरला होणारी आषाढीची पूजाही रद्द केली होती. आज मुख्यमंत्री थोड्याच वेळात चिंचवडला पोहोचणार आहेत. चिंचवडमध्ये क्रांतीवीर चाफेकर संग्रहालयाच्या इमारतीचं भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री चिंचडवला येणार म्हणून मराठा आंदोलकांनी घटनास्थळी धडक दिली असून सरकारविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. काही वेळापूर्वी या आंदोलकांनी लोकमान्य हॉस्पिटलजवळ जमून सरकारविरोधात जोरजोरात घोषणाबाजी केली. ’या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय’, ’मराठा समाजाला आरक्षण द्या, मेगा भरतीला स्थगिती द्या’, अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदविला

 

Related posts: