|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » चाफेकर बंधुंच्या हौतात्मांचे स्मरण रहावे-मुख्यमंत्री

चाफेकर बंधुंच्या हौतात्मांचे स्मरण रहावे-मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड :

देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात पिंपरी चिंचवड शहराचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले गेले आहे. या शहराला इतिहासाची परंपरा आहे. या इतिहासाला त्यागाची आणि देशसेवेची किनार देणाऱया चापेकर बंधूंच्या हौतात्म्याचे चिरंतन स्मरण सर्वांना राहायला हवे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर चापेकर बंधूंविषयी गौरवोद्गार काढले.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱया क्रांतिवीर चापेकर बंधूंचे चिरंतन स्मरण राहावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगावात उभारण्यात येणाऱया त्यांच्या भव्य सहा मजली स्मारकाच्या दुसऱया टप्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. चिंचवडगावातील मोरया गोसावी क्रीडांगण येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार, आमदार, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष, उपमहापौर, सभागृह नेते उपस्थित आहेत.