|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » मराठा आरक्षण आंदोलन चिघळले ; संपूर्ण मराठवाडय़ात आंदोलनाचा भडका

मराठा आरक्षण आंदोलन चिघळले ; संपूर्ण मराठवाडय़ात आंदोलनाचा भडका 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून काल औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरूणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. परभणी, नांदेड, गंगाखेड, लातूर, हिंगोली, परळी, उस्मानाबाद, लासूर, जालना, पटोदासह संपूर्ण मराठवाडय़ात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परभणी जिह्यात गंगाखेडमध्ये आंदोलनादरम्यान एक बस जाळण्यासह 12 वाहने फोडण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला.

गंगाखेड बंदला हिंसक वळण, बस जाळली, सहा एसटी बसेससह 4 खासगी बस फोडल्या असून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गंगाखेड बंदला हिंसक वळण लागले. जमावाने एक एसटी बस जाळण्यासह सहा बसेस तसेच चार खासगी ट्रव्हल्सवर दगडफेक करून नुकसान केले आहे. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने गंगाखेड बंदचे आवाहन केले होते. सकाळपासून बाजारपेठ कडकडीत बंद होती. आरक्षण मिळालेच पाहिजे,अशा घोषणा देत तेथेच ठिय्या आंदोलन करण्यात आले. या दरम्यान, परळीहून गंगाखेडकडे येणाऱया सहा बसेसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. पुणे येथून नांदेडकडे जाणाऱया समई, खुशाल, साई या खासगी आराम बस अडवून त्यावर जमावाने दगडफेक करण्यात आली.

पोलिसांचे शांततेचे आवाहन

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेक केली जात आहे. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. कोणीही कायदा हातात घेऊन नये असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

Related posts: