|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Top News » आकाशवाणीच्या निवेदिका आणि लेखिका सुधा नरवणे यांचे निधन

आकाशवाणीच्या निवेदिका आणि लेखिका सुधा नरवणे यांचे निधन 

ऑनलाईन टीम / पुणे :

आकाशवाणी पुणे केंद्राच्या निवेदिका आणि मराठी लेखिका सुधा नरवणे यांचे हृदयविकाराच्या झटक्मयाने रविवार निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. आपल्या लघुकथांबरोबरच आकाशवाणीवर त्या आपल्या आवाजासाठी देखील प्रसिद्ध होत्या. राज्य पुरस्काराबरोबरच अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी आतापर्यंत त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी ऑल इंडिया रेडीओचे प्रादेशिक केंद्र अर्थात आकाशवाणीसाठी निवेदिका म्हणून काम केले होते. त्यांच्या आवाजात अनेक वर्षे आकाशवाणीच्या सकाळी सात वाजताच्या बातम्यांचे प्रसारण होत असे. तरुण वयातच त्यांनी आपल्या लिखाणाला सुरुवात केली होती. प्रा. एस. आर. पारसनीस हे त्यांचे वडील होत. त्यांच्या मागे पती मुकुंद नरवणे, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.

Related posts: