|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बसस्थानक परिसर बनतोय युवकांचा अड्डा

बसस्थानक परिसर बनतोय युवकांचा अड्डा 

प्रतिनिधी/ सातारा

सर्व महाविद्यालये सुरू झाल्याने महाविद्यालयातील युवकांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शहरातील विविध चौकात तसेच जिह्याच्या बसस्थानक परिसरात हे युवक टोळया करून उभे राहत आहेत. तास् न तास हे युवक सेवन स्टॉर मॉलच्या पार्किंगमध्ये उभे राहून इतर वाहनांना अडथळा निर्माण करतात. धुम्रपानाचे सेवन करत असून त्यांना पोलीस प्रशासनाची कोणतीच भीती वाटत नसल्याने मारामारी, छेडछाड अशा घटना पुन्हा घडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शहरातील सर्व महाविद्यालये गेली दोन महिन्यापासून सुरू झाली आहेत. यामुळे शहर तसेच आजुबाजुच्या गावातील मुले महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी साताऱयात येतात. ही सर्वच मुले नियमित कॉलेजमध्ये बसत नाहीत. काही महाविद्यालयीन परिसरात आणि शहरातील चौकात टिंगल-टवाळक्या करताना दिसत आहेत. दरम्यान कॉलेज परिसरात पोलिसांचा वॉच असून सुध्दा कॉलेज कुमारांना त्यांची भिती राहिलेली नाही.  मात्र आता शहरातील पार्किंग पाईट यांचा अडा बनत चालला आहे. हे चित्र जिह्याच्या बस स्थानकांच्या शेजारी असणाऱया सेवन स्टॉर मॉल येथे दिसत आहे. या मॉलच्या बाहेरील पार्किंग व्यवस्थेत कॉलेजकुमार दुचाकी उभ्या करून गप्पा मारत बसतात. तर काही युवक हे धुम्रपान व दारुचे सेवन करतात. यामुळे या परिसरातून मद्यपिचा अडा बनत चालला आहे.

पोलीस व्हॉन फिरत नाही

या परिसरात लहान मुले, स्त्राrया, वयोवृद्ध यांची ये-जा सुरू असते. तसेच कॉलेज सुटल्यावर युवती या परिसरातून बसस्थानकाकडे जात असतात. यावेळी त्यांच्याकडे बघून इशारे करणे, विचित्र आवाज काढणे, पाठलाग करणे असे प्रकार घडत आहेत. या युवकांना पोलीस प्रशासनाची कोणतीच भीती राहिली नाही. असे प्रकार समोर घडत असताना वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असताना दिसत आहेत. तर पोलीस व्हॉन या परिसरात फिरत नाही. असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे मारामारी, छेडछाड अशा घटना वाढ होणार आहे. 

Related posts: