|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » लातूरामध्ये 8 मराठा आंदोलकांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न

लातूरामध्ये 8 मराठा आंदोलकांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न 

ऑनलाईन टीम / लातूर :

जिह्यातील औसा येथे आठ मराठा आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण जिह्यात खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. आज बीडमधील एका युवकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नसल्याचे त्याने म्हटले आहे. आता औसा येथील तहसिल कार्यालयात मराठा आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. काकासाहेब शिंदे या तरुणाच्या जलसमाधीपासून या आंदोलनाची धार अधिकच तीव्र झाली. त्यानंतर, राज्यात मराठा आंदोलकांकडून आत्महत्येचा प्रयत्न सुरुच आहे. आज लातूर जिह्याच्या औसा तहसिल कार्यालयात आठ आंदोलकांनी एकत्रपणे आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक पोलिसांनी या आंदोलकांना तात्काळ थांबवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीड जिह्यातील अभिजित देशमुख या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेली ही सातवी आत्महत्या आहे. अभिजित देशमुख यांनी मंगळवारी सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. त्यांच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधांचा खर्च या कारणाने आत्महत्या करत आहे, असे लिहिल्याचे आढळले आहे. दरम्यान, संबंधित चिठ्ठी त्यांनीच लिहिली आहे का?, याचा तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी सांगितले. विज्ञान विषयातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होते. त्यांच्यासह कुटुंबीयांवर बँकेचे कर्जही होते. आरक्षण न दिल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बँकेचे कर्जही मिळत नसल्याची बाब त्याने मित्रांकडे व्यक्त केली होती. शिवाय, सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग घेतला होता.