|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » भविष्य » राशीभविष्य

राशीभविष्य 

येत्या अमावास्येला दिव्यांचे पूजन करा भरभराट होईल! (पूर्वार्ध) 

बुध. 1 ते 7 ऑगस्ट 2018

 काहीवेळा आपली काही चूक नसताना नको ते आरोप येतात, पती पत्नीत संशयी वातावरण निर्माण होते, प्रामाणिकपणे राबून देखील त्याचे चीज होत नाही, आपण चांगले वागूनही लोक आपल्यामागे काही ना काही वाईट बोलतच असतात. मागून जे वाईट बोलत असतात ते यांच्या बोलण्यातून आपली लायकी दाखवून देत असतात. ज्यावेळी लोक उलटसुलट अथवा वाईट बोलत असतात, त्यावेळी नक्की समजावे की ज्याच्याविषयी ते बोलतात ती व्यक्ती खरोखर चांगली असते. शत्रू निर्माण करण्याची जरुरी नाही. तुम्ही चांगले वागा, शत्रू आपोआप निर्माण होतात अशी म्हण आहे. या सर्व त्रासातून सुटण्यासाठी दिव्याचे पूजन करायला सांगितलेले आहे. येत्या 11 तारखेला होणारी आषाढी अमावास्या दिव्याची अवस म्हणून ओळखली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांचे पूजन करून दिव्याचा मंत्र म्हणून लाहय़ाचा नैवेद्य दाखवून जे लक्ष्मी पूजन करतात, त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करते. दारिद्रय़ाचा लवलेशही राहत नाही. घरात समृद्धी येते कोर्टप्रकरणे, बदनामी, शत्रुत्व, हाती पैसा टिकत नसेल, आर्थिक घोटाळे, अपमानास्पद परिस्थिती, वारंवार आरोग्य बिघडणे, कुणाच्या मनात शत्रुबुद्धी निर्माण होणे, मुलाबाळांच्या शिक्षण व भाग्योदयातील अडथळे, घटस्फोटापर्यंत गेलेली प्रकरणे, स्वत:चे घरदार होत नसेल, डोळय़ांचे विकार असतील, घरातील कुणी हरवले व त्यांचा पत्ता लागत नसेल, खोटे कागदपत्र अथवा कपटबुद्धीने सहय़ा घेवून कुणी मालमत्ता हडपली असेल, इस्टेट, वाहन, अथवा कुटुंबियावर कुणा पाप्याची वाईट नजर असेल, अचानक काही तरी घडून इस्टेट दुसऱयाच्या हाती गेलेली असेल, जिवावरचे प्रसंग, नोकरीत अधिकाऱयांची गैरमर्जी, व्यवसायातील दुष्ट राजकारण, मागून टोमणे मारणाऱया हीन दर्जाच्या व्यक्ती, मांत्रिकाकडून होणारी आघोरी कृत्ये, स्मशानबाधा, घराण्यातील शापीत दोष या सर्व बाबींतून सुटका होण्यासाठी या अमावास्येला दिव्यांचे पूजन करावे. या अमावास्येला दीपावली लक्ष्मीपूजनापेक्षाही अधिक महत्त्व आहे. म्हणून आंध्र, उत्तर प्रदेश. बिहार, पं. बंगाल, गुजरात व राजस्थान, तसेच कर्नाटकाच्या काही भागात दीपावलीप्रमाणेच रांगोळय़ा काढून दिव्यांची आरास करून मोठय़ा प्रमाणात लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी अभिषेकाच्यावेळी म्हणण्यात येणाऱया श्री सुक्ताची देवतापण अग्नि आहे. जेथे दिवा तेथे लक्ष्मीचा  वास हे सूत्र आहे. ज्यांना शक्मय आहे त्यांनी या अमावास्येला दिव्यांची पूजा करून दिव्याचा कोणताही मंत्र म्हणावा. 108 1009 किंवा त्याहून जास्त म्हटल्यास उत्तमच. स्वत:ला पूजन करता आल्यास चांगलेच, पण ते शक्मय नसेल तर भटजी, गुरुजी अथवा पुरोहितांकडून शास्त्राsक्त लक्ष्मीपूजन करून घ्या. नारळ वगैरे फळांच्या रसाने अभिषेक करा. आपले व जगातील सर्वाचे सर्वार्थाने भले व्हावे ही भावना ठेवून ती पूजा करा. दिव्याचे अनेक मंत्र आहेत. जो मंत्र माहीत आहे, तो म्हणा. ही अमावास्या सर्व बाबतीत कल्याण करणारी आहे. तिचे पावित्र्य भंग होईल असे व्यसन, मांसाहार, तंटेबखेडे, निंदानालस्ती वगैरे अनिष्ट कृत्य आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या. या दीप व लक्ष्मी पूजनाने बरीच संकटे नाहीशी होतात. गेल्या अनेक वर्षापासून लोकांचा अनुभव अतिशय चांगला आहे.

 

मेष

 स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उद्योग व्यवसायात मनासारखे यश मिळत जाईल. सामाजिक कार्यात काम करत असाल तर काही प्रमाणात अडचणी निर्माण होतील. लांबचे प्रवास शक्मयतो टाळा. हाती घेतलेली महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. पूर्ण करा. भावंडाचे सौख्य उत्तम राहील. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा.


वृषभ

कुटुंबामध्ये मंगलकार्याच्या वाटाघाटी सुरू होतील. कोठून ना कोठून हातात पैसा खुळखुळू लागेल. भागिदारी व्यवसायात कागदोपत्री घोटाळे होणार नाहीत, याची काळजी घ्या. नवनवीन ओळखी वाढून हाती घेतलेली कामे मार्गस्थ होतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा पोटाचे विकार उद्भवतील.


मिथुन

स्थावर, जमीनजुमला याबाबतीतील वादविवाद मिटविण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवा. जुनी येणी असतील तर या सप्ताहात मिळतील. महत्त्वाच्या सरकारी कामात अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. मानसिक समाधान ठेवा. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.


कर्क

या सप्ताहात अचानक मोठय़ा प्रमाणात पैसा मिळेल, पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. घरातील रंगसंगती, डागडुजी, रिपेरी यासाठी आणि काही वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक खर्च वाढेल. नोकरी व्यवसायात बदली, बढतीचे योग संभवतात. कुलदेवतेची आराधना करा. महत्त्वाच्या  कामातील अडचणी समस्या दूर होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.


सिंह

या सप्ताहात आर्थिक हानी झालेली भरून निघेल. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. काही महत्त्वाच्या सरकारी कामामध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करतील. व्यापार, उद्योग व्यवसायातील अडचणी कमी होऊन मनासारखे यश मिळत जाईल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. तसेच आरोग्याची विशेष काळजी घ्या. गुडघेदुखी, पायदुखी यापासून जपा.


कन्या

उद्योग व्यवसायासाठी कर्ज काढला असाल तर शक्मयतो लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा, अन्यथा कटकटी निर्माण होतील. काही विरोधक आपला अपमान करण्याचा प्रयत्न करतील. दैवी आराधना व गणपती अथर्व शीर्ष वाढवा प्रगतीतील अडचणी कमी होतील. कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामाला अचानक कलाटणी मिळेल.


तूळ

भावंडाचे उत्तम सौख्य लाभेल. काही महत्त्वाच्या कामासाठी लांबचे प्रवास घडतील. या सप्ताहात सर्व प्रकारे शुभवार्ता ऐकू येतील. मागे तुम्ही कोणाला मदत केला असेल तर त्याचे शुभ फळ आपणास मिळेल. काही सरकारी कामे संथपणाने पार पडतील. घरात मंगल कार्याच्या वाटाघाटी सुरू होतील. साध्यासुध्या आजाराची ऍलर्जी होणार नाही याची काळजी घ्या.


वृश्चिक

महत्त्वाची जी कामे हाती घेतला असाल ती निर्विघ्नपणाने पार पाडा. स्वत:च्या चंचलपणामुळे आर्थिक खर्च वाढेल. त्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. आपले विरोधक आपणास त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण कुलदेवतेच्या कृपेमुळे आपणास त्रास होणार नाही. स्वकष्टाने आपली कामे पूर्ण होतील. तसेच श्री मारुती आराधना सुरू ठेवा. घर निटनिटके व स्वच्छ ठेवा.


धनु

 आर्थिक व्यवहारात चांगले योग, नवे वाहन अथवा कोणतेही नवीन काम सुरू करण्यास हरकत नाही, पण तांत्रिक बाबी मात्र पूर्ण तपासून घ्या. मध्यस्थीच्या दृष्टीने त्रासदायक योग. आर्थिक बाबतीत यश मिळेल. गुंतवणुकीच्या व्यवहारात सावधानता बाळगल्यास पुढे नुकसान होणार नाही, कोर्टकचेरीच्या कामांना गती मिळेल.


मकर

घर, दुकान, फ्लॅट व जागेसंदर्भात कटकटी मिळतील. वैवाहिक जीवनात शुभ घटनांचे नवे पर्व सुरू होईल. भाडेकरू व घरमालक यांच्यातील तणाव संपेल. त्रास देणारे आपणहून दूर जातील. कर्जाचा तगादा लावणारी पत्रे, फोन व संदेश यापासून जरा जपावे लागेल. प्रवास, धनलाभ व महत्त्वाच्या व्यवहारात यश मिळेल.


कुंभ

 आर्थिक व्यवहार जपून करा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुसऱयावर अवलंबून राहिल्याने महत्त्वाची कामे  खोळंबतील. मनस्वास्थ्य ठीक राहणार नाही.सांसारिक जीवनात काळजी घ्यावी. एखादे वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल. पण त्याचा गवगवा करू नका. अन्यथा नको तो गहजब होईल. नोकरीत कामाचा ताण वाढेल.


मीन

वाढत्या खर्चामुळे देणी रेंगाळतील. वैवाहिक जीवनात पूर्वीच्या आठवणींना उजाळा देऊ नका. नोकरी व्यवसायात फेरबदल होतील. देण्याघेण्याच्या बाबतीत सावधपूर्वक पावले उचला. कर्जप्राप्तीसाठी प्रयत्न केला असाल तर काम होईल. पोटाच्या विकारामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शत्रूच्या कारवायावर लक्ष ठेवावे. नोकरी व्यवसायात चांगल्या महत्त्वाच्या  घटना घडतील, पण मतभेद टाळावेत.