|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » leadingnews » मराठा क्रांती मोर्चाचे आज राज्यभर जेलभरो आंदोलन

मराठा क्रांती मोर्चाचे आज राज्यभर जेलभरो आंदोलन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

  सकल मराठा समाजाने आज जेलभरो आंदोलन पुकारले आहे. 9 ऑगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला आहे. काकासाहेब शिंदे यांनी दिलेल्या बलिदानानंतर क्रांती मोर्चाचा वणवा पेटलेला आहे. आता ‘मूक मोर्चा’ निघणार नाही. आज प्रत्येक जिह्यात जिल्हानिहाय जेलभरो आंदोलन केले होणार असून, मुंबईचे जेलभरो आंदोलन आझाद मैदान येथे होईल. याच काळात परळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी राज्यव्यापी खुली बैठक होईल. त्यात 9 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत घोषणा केली जाईल, असे पोखरकर यांनी सांगितले.

  दरम्यान, सरकारला इशारा देण्यासाठी जेलभरो आंदोलन होणार आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाईल. त्यामुळे पुन्हा उदेक होण्याआधी सरकारने योग्य तो निर्णय जाहीर करण्याची गरज पोखरकर यांनी व्यक्त केली. समन्वयक अमोल जाधवराव यांनी सांगितले की, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड जिह्यामध्ये पुकारलेल्या बंददरम्यान ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते तत्काळ मागे घेण्याची मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याशिवाय कोणत्याही मागणीवर आता चर्चा होणार नाही.

  • धनगर समामजाचे आजपासून आरक्षणासाठी तीव्र आंदोलन ; तर मुस्लिम समाजाचे सरकारला आठवडा भराचे अल्टिमेटम
  • मुंबईतल्या आझाद मैदानावर सार्वत्रिक जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत 11 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होईल. तर तिकडे ठाणे, मनमाड, इंदापूर,  परभणी, नंदुरबार इथेही मराठा मोर्चाकडून सार्वत्रिक जेलभरो केला जाणार आहे.
  • पुण्यातल्या जुन्नर तालुक्यात मराठा संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळांना एक दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.
  • सोलापूर : कोंडी गावाजवळ आंदोलकांचा रास्तारोको सुरु, सोलापूर- पुणे महामार्ग ठप्प. महामार्ग रोखल्याने  वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा.