|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वृत्तपत्रांची विश्वासार्हता आजही कायम-न्यायाधिश

वृत्तपत्रांची विश्वासार्हता आजही कायम-न्यायाधिश 

प्रतिनिधी/ सातारा

भारतात अंदाजे 20 कोटी लोक हे व्हॉटस्ऍप वापरतात. याचे जसे अनेक फायदे आहेत तसेच त्याचे दुष्परिणामही आहेत. व्हॉटस्ऍपवर येणारी प्रत्येक बातमी ही खरी नसते. बातमी खरी आहे का याची सत्यता पडताळूनच वृत्तपत्रांनी बातमी प्रसिद्ध करावी. आजही लोकांचा वृत्तपत्रांवर विश्वास आहे, असे प्रतिपादन सायबर विषयातले तज्ञ रोहन न्यायाधीश यांनी आज केले. 

येथील पोलीस विभागाच्या शिवतेज हॉलमध्ये ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ या विषयी आज पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.  या कार्यशाळेस अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कदम आदी यावेळी उपस्थित होते.

न्यायाधिश यांनी सायबर गुन्हे कशी होतात याची माहितीही यावेळी पत्रकारांना दिली.

‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ या विषयावर जिल्हा माहिती कार्यालय व पोलीस विभागाच्या सायबर सेल यांच्यावतीने ही पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी आपल्या प्रास्तविकात सांगितले.