|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » मराठा समाजाला कालबद्ध आरक्षण देणार : देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाला कालबद्ध आरक्षण देणार : देवेंद्र फडणवीस 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी कार्यवाही सुरू झाली असून कायद्याच्या पातळीवर टिकेल असं कालबद्ध आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही अनुकूल आहोत. त्यासाठी कायदेशीर कार्यवाही सुरू असून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कायद्याच्या पातळीवर टिकेल असं कालबद्ध आरक्षण मराठा समाजाला देण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आजच्या बैठकीत मान्यवरांनी अनेक सूचना केल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भातील एक निवेदन तयार करण्यात आलं असून त्यावर सर्वांनी सह्या केल्या असल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना हिंसा आणि आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं.

 

 

Related posts: