|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » अमरावतीत मराठा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

अमरावतीत मराठा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

ऑनलाईन टीम / अमरावती :

मराठा समाज आरक्षणासाठी राज्यात आंदोलने निघालीत तसेच काही आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला असताना, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज एका मराठा समाजातील कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. सकल मराठा समाजाच्या बैठकीच्या अगोदर हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱया मराठा कार्यकर्त्याचे नाव संजय महादेवराव कदम असे आहे. आज, गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास रॉकेलची बाटली हातात घेऊन तो कार्यालय परिसरात पोहोचला. दुपारची वेळ असल्याने कार्यालय आणि परिसरात वर्दळ नव्हती. त्याने रॉकेल अंगावर ओतून घेतले. त्याचवेळी तेथील पार्किंगची व्यवस्था पाहणारा कर्मचारी प्रमोद माहुरकर याने कदमचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. जिल्हाधिकाऱयांच्या दालनासमोर तैनात पोलिसांनी कदमला पकडले. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले आहे.

Related posts: