|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » उद्योग » स्मार्टफोन विक्रीत दुसरी मोठी कंपनी वावे

स्मार्टफोन विक्रीत दुसरी मोठी कंपनी वावे 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

चीन मधील दिग्गज स्मार्टफोन कंपनी वावेने जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनीचा दर्जा प्राप्त केला आहे. भारतात या कंपनीच्या स्मार्टफोनची विक्री सुस्तच राहीली आहे. अशी माहिती एका अहवालातून सादर करण्यात आली आहे.

वावेकडून एप्रिल-जून तिमाहीत 504 कोटी स्मार्टफोनची निर्यात करण्यात आली. यात बाजारातील हिस्सेदारी 15 ते 16 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर दुसऱया क्रमाकावर ऍपल असून त्याने 4.13 कोटी स्मार्टफोन निर्यात केली आहे. बाजारात स्थान 11 ते 12 टक्के आहे. याच वेळी सॅमसंगचे निर्यात 7.4 कोटीचा टप्पा गाठला. तर बाजारात चौथ्या व पाचव्या क्रमाकांवर शामोमी आणि ओप्पो यांचा अनुक्रमाक लागतो असे एका संशोधनातून समोर आले आहे.

वावे ने स्मार्टफोन निर्यातीत जून 2018 तिमाहीत ऍपल स्मार्टफोन कंपनीला पाठीमागे टाकले आहे. व्यापारावर लक्ष ठेऊन असणाऱया संस्थाशी जोडण्यात आलेल्या अहवालात हि माहिती सादर करण्यात आली आहे. एप्रिल -जून तिमाहीत निर्यातीत घसरण झाल्यानंतर जगतिक बाजारात   सॅमसंग स्मार्टफोन प्रथम क्रमांकावर राहीला आहे. स्मार्टफोन बाजारातील हिस्सेदारी 20 टक्कय़ापेक्षा अधिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.