|Saturday, July 20, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय बाजारात लवकरच एसयुव्ही दाखल होणार

भारतीय बाजारात लवकरच एसयुव्ही दाखल होणार 

नवी दिल्ली :

भारतात लवरच एसयुव्ही कारचे लाँचिग करण्यात येणार आहे. चालू वर्ष संपण्याकरिता आजून पाच महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. यात नवीन डिझाईन करण्यात आलेल्या स्पोर्ट्स युटीलिटी कार भारतात सादर होण्याच्या बाकी आहेत. असेही एसयुव्हीकडून सांगण्यात आले.

महिंद्रा, टाटा ,हय़ुडाई या कंपन्यानमध्ये येत्या काही दिवसात इंडियन ऑटोमोबाईल बाजारात नवीन एसयुव्हीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या सादरीकरणात काही कारचे मॉडेल पहिल्यापासून भारतात दाखल आहेत. त्यानांच अपडेट करुन बाजारात आणले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

चालू वर्षात डॅटसनकडून न्यू एसयुव्ही भारतात सादर करण्यात येणार आहे. डॅटसन क्रॉस एसयुव्हीला ऑटो एक्सपो 2016 मध्ये सादर करण्यात आली होती. सादरकेल्यानंतर या कारसाठी इंडोनेशियामध्ये शोअरुम तयार करण्यात आले होते. भारतात या कारचे कोणत्या दिवशी सादरीकरण् होणार आहे. यांचे स्पष्टीकरण आजून कंपनीने सादर केले नाही. परंतु कार प्रदर्शनाच्या दरम्यान या कारचे सादरीकरण करण्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.