|Sunday, May 26, 2019
You are here: Home » Top News » जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. सोपोरमधील द्रुसु गावात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना गुरुवारी रात्री (2 ऑगस्ट) मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी रात्री उशिरा परिसराला घेराव घालत शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान, शुक्रवारी (3 ऑगस्ट) सकाळी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यावेळी जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

मिळालेल्या माहितीनुसार, द्रुसु गावात लपून बसलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण पुलवामा आणि दुसरा सोपोरमधील रहिवासी होता. यातील एक दहशतवादी हा काही दिवसांपूर्वी पुलवामा येथून अचानक बेपत्ता झालेला तरुण असल्याचे म्हटले जात आहे. बेपत्ता झालेल्या या तरुणाला नातेवाईकांनी व्हिडीओद्वारे दहशतवादाचा मार्ग सोडून घरी परण्याचे आवाहन केले होते.

 

Related posts: