|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हातकणंगलेत मुस्लीम बांधवांचा पाठींबा

हातकणंगलेत मुस्लीम बांधवांचा पाठींबा 

हातकणंगले / प्रतिनिधी

   हातकणंगले तहसिल कार्यालय येथे हातकणंगले तालुका मराठा बांधवांचे वतीने चालू असलेल्या आरक्षण संदर्भात ठिय्या आदोलनाच्या दहाव्या दिवशी मराठा बांधवानी मुंडन करून सरकारचा जाहिर निषेध केला. यावेळी हातकणंगले येथील मुस्लीम बांधवानी सुद्धा मोर्चाने येऊन मराठा बांधवांच्या चालु असलेल्या आंदोलना जाहिर पाठिंबा दिला.

   तहसिल कार्यालय येथे चालु असलेले ठिय्या आंदोलनाच्या दहाव्या दिवशी मराठा युवकांनी सरकारचा जाहिर निषेध करत मुंडन केले आणि सरकार विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला यावेळी महेश जाधव, शशिकांत वाळके, रणजीत शिंदे या मराठा युवकांनी मुंडन करून तसेच काही समाज बांधवांनी भाषणातून सरकारविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच पंचायत समिती हातकणंगने येथील सर्व पंचायत समिती सदस्यांनी आपली मासीक मिटींग तहकुब करून या ठिय्या आंदोलनात सहभागी होवून पाठी बा दीला

  याचवेळी हातकणंगले येथील मुस्लीम बांधव मोर्चाने येऊन जय भवानी, जय शिवराय, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे घोषणा देत तहसिल कार्यालय येथे चालु असलेल्या ठिकाणी येवून आपला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी नूरमुहमंद मुजावर, समीर शेख, रमजान मुजावर, रेहमान मुजावर, रजाक मुल्ला, जावेद जमादार, सलमान मांगुरे, राजू सय्यद, राजू शेख, बबलू मुजावर इत्यादी मुस्लीम बांधव तसेच रेंदाळ येथील मराठा बांधव मोठय़ा संखेन या आंदोलनात सहभागी होते.