|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अण्णाभाऊ साठे क्रांतीकारक लेखक : प्रा. आगम

अण्णाभाऊ साठे क्रांतीकारक लेखक : प्रा. आगम 

वार्ताहर / बावधन

महाराष्ट्राला साहित्याची पंढरी म्हणून ओळखले जाते. या मातीतील अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनीने उपेक्षित वंचितांचे वास्तव समाजापुढे ठेवले. अन्याय अत्याचारावर सतत प्रकाश टाकला. त्यांची संकटे आपल्या लेखनीद्वारे समाजापुढे मांडणारे अण्णाभाऊ क्रांतीकारक लेखक होते, असे प्रतिपादन प्रा. विजय आगम यांनी केले.

बावधन (ता.वाई) येथे अमरदीप गणेश मंडळाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 98 वी जयंती सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी प्रा. आगम बोलत होते.

प्रा. के. बी. कांबळे म्हणाले, कथा कादंबऱयातून केवळ मनोरंजनाचा भाग न घेता समाज प्रबोधन आणि वास्तव जीवनाचे प्रदर्शन झाले पाहिजे. त्याचे साहित्य उपेक्षित समाजाला दिशा देण्यासाठी लिहिले गेले होते. येथील मंडळाने वाटेगांव ते बावधन ज्योत आणली होती. तिचे स्वागत ग्रामस्थांनी उत्साहात केले. कार्यक्रमात गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी तानाजी कचरे, वैष्णवी कांबळे, दिप्ती कांबळे, हर्षदा मोहिते यांची अण्णाभाऊ व टिळकांच्या जीवनावर भाषणे झाली. कार्यक्रमास उपसरपंच हेमलता देवकाते, माजी उपसरपंच अमोल जाधव, प्रविण संकपाळ, संजय सकटे, वंदना कांबळे, सुनील चव्हाण, हनमंत आबा कदम, विनायक कांबळे, महेश ननावरे, निलेश भोसले, राजेंद्र कांबळे, जगन्नाथ कांबळे, अनिकेत कांबळे, अरुण माने, बादल रिठे, उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप कांबळे यांनी तर जगन्नाथ कांबळे यांनी आभार मानले.