|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » भक्तांना आतुरता लागली गणरायाच्या आगमनाची

भक्तांना आतुरता लागली गणरायाच्या आगमनाची 

वार्ताहर/ शाहूपुरी

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणरायाचे वेध बालचमूनपासून सर्वांना लागले आहेत. महिन्याभरापासून सातारा शहरात व उपनगरातील परिसर गणेशमूर्ती कारखाने गजबजू लागली आहेत. यंदा 13 सष्टेंबर रोजी गणेशोत्सव असून मंडळाच्या कार्यकर्त्यांना आतापासून वेध लागल्याचे दिसून येत आहे. तसेच सोशल मीडियावर संदेशाची देवाणघेवाण आतापासूनच होताना दिसत आहे.

मुर्तीकारांमध्ये गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू असलेली दिसत आहे. गडकरी आळी, शाहूपुरी, बुधवार नाका, कुभांरवाडा रविवार पेठ येथे गणपती बनविण्यासाठीचे कारखाने आहेत. गेल्यावर्षापासून मुर्तीकारांनी शाडूच्यामुर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. शाडूच्या मूर्ती पर्यावरण पुरक असल्याने जलप्रदूषण होत नाही. मूर्ती रंगरंगोटीच्या कामांना गती देण्यात आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने कामाला गती आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुर्तीकार घरगुती गणपती मोरावरील, बाहूबली, शंखावरील, पोलीस, शकंर-पार्वती, छोटा भीम अशा विविध रुपातील गणेश मूर्ती साकारण्याचे काम चालू आहे. सार्वजनीक गणेश मूर्ती व घरगुती शाडूच्या मुर्ती पुजण्यासाठी प्रदूषण मंडळासह नागरिकही आग्रही झालेले दिसून येत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही काही दिवसांपासून बप्पांच्या आगमनाची चाहूल सर्वांनाच लागल्याचे दिसून येत आहे.

राजधानी गणेशोत्सव ‘लय भारी’ अशी सगळ्यांचीच भावना आहे. जिह्यात गेल्या दोन वर्षापासून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यामुळे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ढोलताशे, झांझ पथक मंडळांचे पदाधिकारी तयारीला लागले आहे. ढोल-ताशांचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत.