|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » 22 वर्षीय तरूणीवर ठाण्यात भरदिवसा हल्ला

22 वर्षीय तरूणीवर ठाण्यात भरदिवसा हल्ला 

ऑनलाईन टीम / ठाणे :

ठाण्यात भरदिवसा एका 22 वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमी अवस्थेत या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर ठाण्यात खळबळ उडाली आहे.

हायवेलगत आरटीओ कार्यालयासमोरच सकाळी 11 वाजता ही घटना घडली. हल्लेखोराने प्राची विकास झाडे या 22 वर्षीय वषीय तरुणीवर चाकूने वार केले. त्यानंतर तो पसार झाला. या हल्ल्यात प्राची गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या हल्ल्यामागील कारण समजू शकले नाही. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

 

Related posts: