|Thursday, April 18, 2019
You are here: Home » भविष्य » सेकंडने दक्षिण आफ्रिका अ चा डाव सावरला

सेकंडने दक्षिण आफ्रिका अ चा डाव सावरला 

 

सेकंडने दण आफ्रिका अ चा डाव सावरला

वृत्तसंस्था बेंगळूर                                                                                                                                      शनिवारपासून येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू झालेल्या चार दिवसांच्या सामन्यात सेकंडच्या समयोचित अर्धशतकाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा पहिला डाव सावरला दिवसअखेर दक्षिण आफ्रिका अ संघाने पहिल्या डावात 8 बाद 246 धावा जमविल्या इंडिया अ संघातर्फे सिराज, सैनी, गुर्बानी यांनी प्रभावी गोलंदाजी केली.

या सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सेकंडने 139 चेंडून 12 चौकारांसह 94, इर्वेने 7 चौकारांसह 47, कर्णधार झोंडोने 5 चौकारांसह 24, मुथुसॅमीने 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. मुथुसॅमी आणि सेकंड यांनी पाचव्या गडय़ासाठी 59 धावांची भागिदारी केली. इंडिया अ संघातर्फे सिराजने 56 धावांत 3, सैनीने 47 धावांत 2 तर गुर्बानीने 47 धावांत 2 आणि चहालने 54 धावांत 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

द. आफ्रिका अ प. डाव 88 षटकांत 8 बाद 246 (सेकंड 94, इर्वे 47, झोंडो 24, मुथुसॅमी 23, सिराज 3/56, सैनी 2/47, गुर्बानी 2/47, चहाल 1/54).

 

Related posts: