|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पेयजल’मधून ‘करवीर’साठी 22 कोटी 50 लाख निधी

पेयजल’मधून ‘करवीर’साठी 22 कोटी 50 लाख निधी 

आमदार चंद्रदीप नरके यांची माहिती

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   करवीर विधानसभा मतदारसंघातील करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील 40 गांवे व वाडय़ांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या आराखडयास मंजूरी मिळाली असून 22 कोटी 50 लाख इतका निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकाद्वारे दिली.

   आमदार नरके म्हणाले, डिसेंबर 2016 चे हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी चर्चेदरम्यान मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गांवाचा समावेश करण्यासाठी तसेच एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱया गांवाचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये करण्याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आदेश दिले होते. तसेच जिल्हयातील अपुऱया नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामासाठी निधी व नवीन गांवाचा समावेश करण्याबाबत बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱया गांवाचा समावेश करण्याबाबत शासन निर्णय केला जाईल असे आश्वासन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांनी दिले होते. यामुळे या गांवातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या योजनेमध्ये करवीर तालुक्यातील 12 गांवे, पन्हाळा तालुक्यातील 22 गांवे तर गगनबावडा तालुक्यातील 6 गांवाचा समावेश आहे.       

   करवीर, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील गांवे व मंजूर अंदाजित रक्कम (रुपये लाखात)- करवीर – कोपार्डे (4 कोटी 37 लाख 42 हजार), बेले (1 कोटी 40 लाख), गणेशवाडी  (1 कोटी 25 लाख), नागदेववाडी  (1 कोटी 21 लाख), शिरोली दु. (90 लाख), चाफोडी (85 लाख), सावरवाडी (75 लाख), उपवडे (73 लाख 43 हजार), कारंडेवाडी (65 लाख),पासार्डे (42 लाख), केकतवाडी (21 लाख), शिपेकरवाडी (19 लाख 20 हजार)

    पन्हाळा – कळे (1 कोटी 50 लाख), वारनूळ (80 लाख), आसगांव (70 लाख), मानवाड (66 लाख), पोहाळवाडी (60 लाख), परखंदळे (50 लाख), वेतवडे (50 लाख), मल्हारपेठ (50 लाख), पोहाळे तर्फ बोरगांव (50 लाख), पिसात्री (50 लाख), सातार्डे (50 लाख), कोलीक (40 लाख), आंबर्डे (40 लाख), खोतवाडी (40 लाख), वेतवडे पैकी खामणेवाडी (35 लाख), मोरेवाडी (34 लाख), सावर्डे तर्फ असंडोली (30 लाख), वेतवडे पैकी धनगरवाडा (25 लाख), तांदूळवाडी पैकी गोठमवाडी (20 लाख), वेतवडे पैकी मुसलमानवाडी (20 लाख), कोलीक पैकी चाफेवाडी (20 लाख), वाशी (20 लाख)

   गगनबावडा –  धुंदवडे (35 लाख), मुटकेश्वर (27 लाख), शेळोशी (25 लाख), खडुळे (24 लाख), पळसंबे (22 लाख), निवडे (17 लाख)  असे एकूण रक्कम रुपये 22 कोटी 50 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सहकार्य लाभले असल्याचे आमदार नरके यांनी स्पष्ट केले आहे.