|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » फ्रेंडशिप डे निमित्त एचआयव्हीग्रस्त मुलांची ‘पार्टी’

फ्रेंडशिप डे निमित्त एचआयव्हीग्रस्त मुलांची ‘पार्टी’ 

नवविधा प्रोडक्शन निर्मित आणि सुपरहिट ‘बकेट लिस्ट’ सिनेमाचे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘पार्टी’ हा सिनेमा येत्या 7 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित मैत्रीची परिभाषा मांडणाऱया सिनेमाने नुकताच गोरेगाव येथील एचआयव्हीग्रस्त मुलांचे संगोपन करणाऱया डिझायर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेमध्ये, सर्व कलाकारांच्या उपस्थितीत फ्रेंडशिप डे साजरा केला. कलाकारांनी सर्व मुलांशी संवाद साधत त्यांना भेटवस्तूदेखील दिल्या. संस्थेच्या मुलांनीही ‘पार्टी’ सिनेमातील भावडय़ा या गाण्यावर ठेका धरत, फ्रेंडशिप डेच्या या धम्माल पार्टीचा मनमुराद आनंद लुटला.

 सिनेमातील भावडय़ा या गाण्याचे वैशिष्टय़ म्हणजे, संगीतसफष्टीतील दोन मित्रांनी, मैत्रीवर आधारित असलेले हे गाणे, खास मित्रांसाठी सादर केले आहे. अवधूत गुप्ते आणि अमितराज या जुन्या मित्रांचे हे गाणे फ्रेंडशिप डेच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आले असल्यामुळे या गाण्याला तुफान प्रसिद्धी मिळेल, अशी आशा आहे. अमितराजच्या चालीवर अवधूतने गायलेल्या या गाण्याचे लिखाण सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी केले आहे. मित्राच्या हळदीचे हे भन्नाट गाणे, प्रेक्षकांना नादखुळा करून सोडणारे आहे. हे गाणे रात्रीचे असल्याकारणामुळे, त्याच्या चित्रीकरणासाठी सर्व कलाकारांना सलग दोन रात्र काम करावे लागले होते. शिवाय, गाण्यात हळदीचा माहोल उभा करण्यासाठी तब्बल 50 किलो हळदीचा वापर यात करण्यात आला. रात्रभर काम करूनदेखील पार्टीच्या सर्व टीमने हे गाणे सेटवर मोठय़ा आवाजात लावत, संपूर्ण र्क्यू मेंबरसोबत ताल धरला होता. शिवाय, उरलेली हळद उधळवत या गाण्याची मज्जादेखील लुटली.

 अशा या धम्माल पार्टीचा रंग चढवणाऱया सिनेमात सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला प्रमुख भूमिकेत असून या सहाजणांची फक्कड मैत्री दाखवणारा हा सिनेमा प्रेक्षकांना फ्रेंडशिप डेचे अनोखे सरप्राईज घेऊन येत आहे.

Related posts: