|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » ऍसिड हल्ल्यातून वाचलेले खरे हिरो आहेत : माधुरी दीक्षित

ऍसिड हल्ल्यातून वाचलेले खरे हिरो आहेत : माधुरी दीक्षित 

कलर्सच्या लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो डान्स दिवाने त्याच्या वेगळय़ा प्रकारच्या विषयातून वेगवेगळय़ा वयाच्या टॉप 20 स्पर्धकांवर स्पॉटलाइट टाकला आहे आणि त्यांना डान्सची त्यांची दिवानगी सादर करण्याची संधी दिली आहे. मनोरंजनाचा घटक अजून उंचावर नेण्यासाठी या आठवडय़ात लग्न ही संकल्पना होती. ज्यात सर्व स्पर्धक भारतीय लग्नांमधील विविध संस्कृती आणि रूढी त्यांच्या नफत्यांमधून सादर करण्याचा प्रयत्न करतात.

नफत्य खऱया अर्थाने लाखो भाषा बोलते आणि भावना यथार्थपणे व्यक्त करण्याची त्यात ताकद असते. सिझा आण करण यांनी तुही रे या गाण्यावरील हृदयस्पर्शी कामगिरीतून हेच सिद्ध केले आहे. त्यांच्या कामगिरीतून ऍसिड हल्ल्यातून वाचलेल्यांची कथा सादर केली आहे जो तिच्याशी तिच्या प्रेमासाठी लग्न करतो आणि आनंद मिळवतो. माधुरी दीक्षित या संपूर्ण कथा सादरीकरणाने अतिशय रोमांचित झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, एखादी व्यक्ती मुलीवर इतकी प्रेम करत असते मग ती तिने दिलेल्या नकाराने तिच्याशी इतक्या खुनशीपणे कशी वागू शकते हेच मला समजत नाही. अशा लोकांची ही स्वार्थी वफत्ती माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे. कारण ते इतके खुनशी असू शकतात आणि अशी कठोर पावले टाकू शकतात. मला वाटते की, प्रत्येक मुलीला तिचा जीवनाचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि तिच्या निर्णयासाठी तिच्यावर असा खुनशी हल्ला किंवा आघात केला नाही पाहिजे. दर शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता कलर्स वाहिनीवरही डान्स दिवाने कार्यक्रम प्रसारित होतो.