|Saturday, April 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » दोन किनारे दोघे आपण ध्वनीफित प्रकाशित

दोन किनारे दोघे आपण ध्वनीफित प्रकाशित 

संगीत माणसाला हसायला, जगायला आणि आनंदी राहायला नेहमीच प्रेरित करते. शब्दांना आणि भावनांना संगीत सहज व सोपेपणे प्रकट करते. असाच मनाचा ठाव घेणाऱया ‘दोन किनारे दोघे आपण’ या ध्वनिफितीचे प्रकाशन प्रसिद्ध सतारवादक शेखर रानडे आणि साहित्यिक अरुण फडके यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी प्रभाकर गुणे, गीता गुणे, प्रणव हरिदास, रसिका गुणे असे अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

आपल्या प्रिय व्यक्तीला भेट म्हणून कोणी फुले देते तर कोणी मिठाई देते. मात्र, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोने नवऱयाला दिलेली अनोखी भेट म्हणजे ही ध्वनिफीत. गीता गुणे यांनी त्यांचे पती प्रभाकर गुणे यांची लिहिलेली गीते त्यांच्या नकळतपणे त्यांनी ती संगीतबद्ध करून त्यांची ध्वनिफीत तयार करून त्यांच्या वाढदिवसाला ही अनोखी भेट दिली. या ध्वनिफीतमध्ये एकूण 8 गीते असून अभंग, गजल, भावगीत, लोकगीत, प्रेमगीत, जीवनगीत, युगलगीत अशा गीतांचा यात समावेश आहे. ही सर्व गीते प्रभाकर गुणे यांनी लिहिली असून संगीत प्रभाकर गुणे, प्रणव हरिदास, मैत्रेय-साहिल आणि ओंकार जांभेकर यांचे आहे. तर गायक पं. संजीव चिम्मलगी, अभिषेक नलावडे, रचना मुळे, आदिती आमोणकर, गीता गुणे, अवंती बपोरीकर यांनी गायली आहेत. तर ध्वनिफीतीची निर्मिती गीता गुणे यांनी केली आहे. ही सर्व गीते रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील अशी आहेत, असा विश्वास गीतकार प्रभाकर गुणे यांनी आयोजित केलेल्या सोहळय़ात व्यक्त केला.

Related posts: