|Saturday, April 20, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » स्वातंत्र्यदिनी हिमालयावर फडकविणार भव्य तिरंगा

स्वातंत्र्यदिनी हिमालयावर फडकविणार भव्य तिरंगा 

ऑनलाईन टीम/ पुणे

पुण्यातील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेतर्फे यंदाचा स्वातंत्र्यदिन हिमालयातील माऊंट युनाम शिखरावर भव्य तिरंगा फडकावून करण्यात येणार आहे. संस्थेचे 10 गिर्यारोहक 14 फूट उंच आणि 25 फुट लांब तिरंगा हिमालयाच्या शिखरावर फडकवणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील पिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

1993 साली स्थापन झालेल्या या संस्थेला यंदा 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने हा आगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हिमालयावर फडकविण्यात येणाऱया ध्वजासाठी लागणारा सुमारे 16 किलोचा लोखंडी खांबही सोबत नेण्यात येणार आहे. तर संस्थेचे सदस्य गोपाल भंडारी गिटारवर राष्ट्रगीत वाजविणार आहेत. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही शिखरावर नेऊन त्याचे तिथे पूजन करून शिव घोषणाही आम्ही देणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.

ही मोहीम 7 ऑगस्टला प्रारंभ होऊन 20 ऑगस्टपर्यंत फत्ते करण्यात येणार आहे. धनराज पिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली गोपाल कडेचूर, अनिकेत बोकील, सुनील पिसाळ, सायली महाराव, सद्गुरू काटकर, प्रशांत अडसूळ, सोमनाथ सोरकडे, स्वप्तील गराड आणि अभिजित जोशी हे गिर्यारोहक ही मोहीम फत्ते करणार आहेत.

Related posts: